21 October 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

बीड: जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवर ‘लव्ह, सेक्स आणि दारु’

एक महिला आणि दोन पुरुषांना रंगेहाथ पकडले

बीड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

बीड शहरामधील जिल्हा रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयामधील वॉर्ड क्रमांत सहाच्या छतावरुन गुरुवारी मध्यरात्री दोन पुरुष आणि एका महिलेला अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले आहे. रुग्णलयातील कर्मचाऱ्यांनी या तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र या तिघांनाही केवळ वरवर चौकशी करुन सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारी रुग्णालयामध्ये असा प्रकार झाल्यानंतरही पोलिसांनी या तिघांवर कोणतीही कठोर कारवाई न करता सोडून दिले आहे. वाचा सविस्तर…

‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हीच महाराष्ट्रासाठी गोड बातमी!’

भाजपातले ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपासून कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल असं वक्तव्य केलं आहे. याच वक्तव्याचा समाचार शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हीच महाराष्ट्रासाठी गोड बातमी आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या नशिबात एक स्वाभिमानी सरकार येणार आहे तसे भाग्य मराठी जनतेच्या ललाटी लिहिले आहे. ती भाग्यरेषा पुसण्याची ताकद कुणाच्यातही नाही असे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून गोड बातमीच्या वक्तव्यावरुन सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर…

पराभूत उमेदवार पुन्हा आपापल्या व्यवसायात गुंतले

निवडणुकीत पराभूत होण्याचे शल्य न ठेवता पराभूत उमेदवारांनी सहजतेने आपल्या व्यवसायात परत झोकून दिल्याची स्थिती दिसून येते. विजयी झालेले आमदार सत्ता स्थापनेचा खेळ मुंबईत तळ ठोकून बघत आहे. अनेकांना नव्या सत्ता रचनेत वाटा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांचे उद्दिष्ट सफ ल झाले. मात्र पराभूत बडय़ा उमेदवारांना पराभवानंतर कार्यकर्त्यांची समजूत भेटीगाठी घेऊन करावी लागत आहे. त्यात काही दिवस गेल्यानंतर आता हे उमेदवार आपल्या कामाला लागले. तीनवेळा चांदूर रेल्वेतून आमदार झालेले प्रा. वीरेंद्र जगताप यावेळी पराभूत झाले. मात्र निकालाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी महाविद्यालय गाठून सेवेत सुरुवात केली. वाचा सविस्तर…

भारताची दुहेरी परीक्षा!

नवी दिल्लीतील प्रदूषित वातावरणात पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर गुरुवारी राजकोटवर रंगणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघापुढे दुहेरी आव्हान असणार आहे. राजकोटमध्ये चक्रीवादळाची शक्यता असल्याने यावेळीसुद्धा आव्हानात्मक परिस्थितीतच भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी लढाऊ बांगलादेशला नमवण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. वाचा सविस्तर…

सलमान खानला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती

सलमान खान दबंग ३ च्या निमित्तानं पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी येत आहे. सध्या तो याच चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. सलमान आणि त्याचा फिटनेस हे नातं सर्वांच्याच परिचयाचं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तो यासंदर्भातील नवनवे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. सलमानच्या अन्य अॅक्शनपटांसारखाच दबंग ३ मध्येदेखील सलमान निरनिराळे स्टंट करताना दिसेल. परंतु गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट आपल्याला सतावत असल्याची माहिती खुद्द सलमाननंच एका मुलाखतीदरम्यान दिली. वाढत्या वयोमानानुसार अॅक्शन सीन करणं आपल्याला कठिण जात असल्याचं सलमान म्हणाला. वाचा सविस्तर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 9:25 am

Web Title: morning bulletin top five news avb 95 17
Next Stories
1 भारताकडे प्रत्यार्पण केल्यास आत्महत्या करेन; नीरव मोदीची धमकी
2 नीरव मोदीचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
3 ..मग लोकांना मरू द्यायचे का?
Just Now!
X