राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात पुन्हा भाजपाच?; मोदी, पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यांनंतर चर्चांना उधाण

राज्यातील सत्ता स्थापनेची समिकरणे बदलली?

शरद पवार, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस[/caption]

राज्यसभेच्या अडीचशेवे सत्र सोमवारी सुरु झाले. या सत्राच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी केलेल्या भाषणात राष्ट्रवादीचे कौतुक केले. तर दुसरीकडे शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या दोन महत्वाच्या नेत्यांनी केलेली सुचक वक्तव्ये आणि त्यातच शिवसेनेची झालेली गोची यामुळेच आता राज्यामध्ये पुन्हा एकदा २०१४ प्रमाणे भाजपा बहुमत सिद्ध करण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे. वाचा सविस्तर..

सत्तास्थापना लांबणीवरच

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना प्रत्यक्षात सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. वाचा सविस्तर…

खड्डे दाखवून पाच हजार रुपयांची कमाई

‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ या पालिकेच्या मोहिमेत खड्डय़ांबाबत सर्वाधिक ५० तक्रारी करता शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या प्रथमेश चव्हाण याने सर्वात जास्त म्हणजे पाच हजार रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. त्याने केलेल्या तक्रारीतील १० खड्डे पालिकेला २४ तासात बुजवणे अशक्य झाले असून उर्वरित खड्डय़ांसाठी बक्षीस देणे पालिकेला भाग पडले आहे. वाचा सविस्तर…

ओमानविरुद्ध भारताला विजय अनिवार्य

‘फिफा’ विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील आतापर्यंतच्या चारही सामन्यांत निराशाजनक कामगिरी करणारा भारतीय संघ विजयापासून वंचित राहिला आहे. त्यामुळेच मंगळवारी होणाऱ्या बलाढय़ ओमानविरुद्धच्या सामन्यात भारताला आव्हान टिकवण्यासाठी झगडावे लागणार आहे. वाचा सविस्तर…

‘Inside Edge 2’ : क्रिकेट, फिक्सिंग, पॉलिटिक्स, ड्रग्स, सेक्स आणि पावर गेमची कहाणी

‘इंसाइड एड’ ही वेब सीरिज चाहत्यांच्या कायमच लक्षात राहणारी ठरली होती. अॅमेझॉन प्राईमवर आलेल्या या वेब सीरिजनं सर्वांची वाहवा तर मिळवलीच होती, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरही अॅमी अवॉर्ड्समध्ये आपली छाप सोडली होती. क्रिकेटमधील स्पॉट फिक्सिंगसारख्या प्रकरणावर ही वेब सिरीज आधारित होती. स्पॉट फिक्सिंग, पॉलिटिक्स, पैसा, सेक्स, ड्रग्स, पावर गेम आणि क्रिकेट या सर्वांचा योग्य ताळमेळ यात बसवण्यात आला होता. परंतु मॅच फिक्सिंगभोवतीच ‘इंसाइड एज’ची कथा फिरत होती. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘इंसाइड एज’चा दुसरा सिजन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतान अॅमेझॉननं या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिजनचा ट्रेलर लॉन्च केला आहे. आकाश भाटियानं याचं दिग्दर्शन केलं आहे. ६ डिसेंबर रोजी या वेब सीरिजचा दुसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाचा सविस्तर…