News Flash

मॉर्निंग बुलेटीन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

मुंबईसह, नवी मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्येही पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. तो पाऊस अखेर बरसण्यास सुरूवात झाल्याने मुंबईकरांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ठाणे जिल्ह्यातही सगळीकडेच पावसाने हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील अंधेरी, पवई या ठिकाणी जोरदार पाऊस पडू लागला आहे. जून महिन्याच्या सुरूवातीलाच पाऊस सुरू होतो. मात्र घामाच्या धारांनी मुंबईकर जूनच्या अखेरपर्यंत हैराण झाले होते. त्या सगळ्याच मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे. वाचा सविस्तर

दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू-पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू आहे, या समस्येशी लढणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्सच्या बैठकीत केले. आजपासून जपानमधील ओसाका या ठिकाणी ब्रिक्स देशाची जी २० परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत ब्रिक्स देशांचा सहभाग आहे. या परिषदेत बोलताना दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर…

‘पाकिस्तानला विश्वचषकाबाहेर करण्यासाठी भारत मुद्दाम पराभूत होणार’

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकातील चुरस दिवसेंदिवस वाढत आहे. अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेलेत. ऑस्ट्रलिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्क केलंय, तर भारताचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. त्यामुळे आता चौथ्या स्थानासाठी रंगतदार स्पर्धा आहे पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड या तीन संघांमध्ये. या संघाना स्वतःचे सर्व सामने जिंकायचे आहेतच पण याशिवाय इतर संघानी पराभूत व्हावं अशी प्रार्थना देखील करावी लागणार आहे. यात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे बेभरवशाचा संघ म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानची. याच दरम्यान, पाकिस्तानी संघाच्या एका माजी खेळाडूने भारतीय संघावर अत्यंत गंभीर आणि तितकेच हास्यास्पद आरोप केले आहेत. वाचा सविस्तर…

ट्रम्प आणि मोदी भेट, चार प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा

ओसाका या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत इराण, 5G,दोन्ही देशांमधले चांगले संबंध आणि सुरक्षा विषयी संबध या चार मुद्द्यांवर चर्चा होईल असे स्पष्ट केले. जपानमधील ओसाका या ठिकाणी जी २० परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. वाचा सविस्तर…

ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे निधन

ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरूवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ठाणे येथील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीत विश्वातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरवल्याची खंत व्यक्त होते आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तबला वादन या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला. वाचा सविस्तर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 10:34 am

Web Title: morning bulletin top five news avb 95
Next Stories
1 दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू-पंतप्रधान नरेंद्र मोदी
2 ट्रम्प आणि मोदी भेट, चार प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा
3 अमेरिकी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करा!
Just Now!
X