शिवसेना-भाजपा सरकारसाठी हिंदुत्ववादी संघटनांचा पुढाकार; संभाजी भिडे मांडणार भूमिका
संभाजी भिडे आपली भूमिका मांडणार आहेत.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या आघाडीसाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपानं एकत्र यावं यासाठी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेकला आहे. सविस्तर वाचा…

राजस्थानमध्ये स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश

सत्ताधारी काँग्रेसने राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. काँग्रेसला ९६१ तर भाजपला ७३७ प्रभागांमध्ये विजय मिळाला. मंगळवारी हे निकाल जाहीर करण्यात आले. राज्यात ४९ पैकी २३ नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे, तर भाजपला सहा ठिकाणी सत्ता मिळाली आहे. इतरांना २० पालिकांमध्ये यश मिळाले आहे. वाचा सविस्तर…

कौमार्य सिद्ध करणाऱ्या फसव्या गोळ्यांची सर्रास विक्री

समाजातील गैरसमजुतींमध्ये आणखी भर :- पहिल्या शरीरसंबंधांनंतर स्त्रीच्या जननमार्गातून रक्तस्राव होतो, ही संकल्पना अवैज्ञानिक असल्याचे सिद्ध झाले असतानाही लग्नानंतर कौमार्यत्व पटवून देणाऱ्या ‘व्हर्जिनिटी कॅप्सूल’चा सुळसुळाट झाला आहे. या गोळ्यांची सर्रास ऑनलाइन विक्री होत असून स्त्रीच्या कौमार्याविषयी समाजात आधीच असलेल्या गैरसमजुतींना या फसव्या गोळ्यांच्या मार्गाने आणखी खतपाणी घातले जात आहे. वाचा सविस्तर…

रिलायन्स जिओचाही शुल्कवाढीचा मानस

खासगी दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेलपाठोपाठ रिलायन्स जिओनेही नजीकच्या दिवसात मोबाइल सेवा शुल्कवाढीचे संकेत दिले आहेत. वाचा सविस्तर…

फलंदाजांना चकवण्यासाठी सातत्याने चेंडूची दिशा बदलेन!

भारत-बांगलादेश कसोटी मालिका :- बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात फलंदाजांना चकवण्यासाठी मी सातत्याने चेंडूच्या दिशेत बदल करेन, अशी प्रतिक्रिया भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मंगळवारी व्यक्त केली. वाचा सविस्तर…

शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात मावळ्यांचे अनन्यसाधरण महत्व आहे. याच शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आणणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेता अजय देवगण साकारणार असून छत्रपती शिवाजी महारांची भूमिका मराठमोळा अभिनेता शरद केळकर वटवणार आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी चित्रपटातील काही कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. दरम्यान असा काही किस्सा घडला घडला की उपस्थित असलेल्या सर्वांनी अभिनेता शरद केळकरवर टाळ्यांचा वर्षाव केला. वाचा सविस्तर…