भगव्या ध्वजाशी वैर घ्याल तर स्वत:चेच नुकसान कराल : शिवसेना
उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सत्य व न्यायाच्या सर्व कसोट्यांवर उतरून स्थिरस्थावर होईल.

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर गुरूवारी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आपल्या नव्या कारकिर्दीला सुरूवात केली. उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतरही शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसत आहे. भगव्या ध्वजाशी वैर घेऊ नका. वैर घ्याल तर स्वतःचेच नुकसान करून घ्याल, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. वाचा सविस्तर…

“पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील लहान भावाला साथ द्यावी”

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर गुरूवारी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आपल्या नव्या कारकिर्दीला सुरूवात केली. दरम्यान, यापूर्वी शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. परंतु काही कारणास्तव ही युती तुटली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्यानं महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करत शिवसेनेनचा मुख्यमंत्री विराजमान झाला. दरम्यान, सध्या राज्यासमोर अनेक मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशातच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून राज्यातील लहान भावाला म्हणजेच मुख्यमंत्र्यांना साथ द्यावी, असं आवाहन शिवसेनेनं केलं आहे. वाचा सविस्तर…

महाआघाडीमुळे राज्यसभा, विधान परिषदेत अधिक जागा मिळण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांच्या सत्तावाटपाच्या चर्चेत आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या एकत्रित जास्त जागा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच तीन पक्ष एकत्र आल्याने विधान परिषदेत बहुमत होणार आहे. वाचा सविस्तर…

मालदीवचे माजी अध्यक्ष गयूम यांना ५ वर्षांचा कारावास

मालदीवचे माजी अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या (मनी लाँडरिंग) आरोपाखाली दोषी ठरवून देशातील एका न्यायालयाने त्यांना ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. गयूम यांनी ५० लाख डॉलरचा दंड भरावा, असाही आदेश पाच सदस्यांच्या एका फौजदारी न्यायालयाने दिला. वाचा सविस्तर…

‘दबंग ३’ सुपरफ्लॉप म्हणत केआरकेची सलमानवर टीका

सध्याचा बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणजे सलमान खानचा ‘दबंग ३.’ काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. चाहत्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी ‘मुन्ना बदनाम हुआ’ गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये सलमान आपल्या दबंग अंदाजात नृत्य करताना दिसत आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्याचा टीझर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण ‘दबंग ३’ चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खानला फारशी भावली नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने ट्विटरद्वारे चित्रपटासंबंधीत भविष्यवाणी केली आहे. वाचा सविस्तर…