News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

VIDEO: “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र आलं पाहिजे”
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी ठाकरे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे

“उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र आलं पाहिजे. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ठाकरे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने उद्धव आणि राज या दोघांची समजूत घातली होती. मात्र दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यानंतर झालेल्या काही कार्यक्रमांंमध्ये हे दोघे एकत्र आले होते. मात्र ठाकरे घराण्यातील एक माहेरवाशीण म्हणून माझं अजूनही हेच मत आहे की आता या दोघांनी एकत्र आलं पाहिजे” राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी करंदीकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना या भावना व्यक्त केल्या. वाचा सविस्तर…

गांधी परिवाला धोका कमी झाला हे नक्की कोणाला वाटतं ?; शिवसेनेचा सवाल

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या गांधी कुटुंबातील तीनही सदस्यांची एसपीजी कमांडोंची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली असून केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे. ‘आयबी’ आणि ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधी कुटुंबाच्या जिवाला असणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत आढावा घेतल्यानंतरच सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणं होतं. आता यावर शिवसेनेनं सवाल उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर…

उपमुख्यमंत्री आणि अध्यक्षपदावरून घोळ

महाविकासआघाडीच्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता. यात बदल करून उपमुख्यमंत्रीपद मिळावे, असा आग्रह काँग्रेसकडून शुक्रवारी धरण्यात आला. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावली. तरीही काँग्रेसचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरूच होते. वाचा सविस्तर…

धडाकेबाज खेळीने वधारला रोहितचा भाव, वर्षाकाठी कमावतोय तब्बल XX रुपये

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी २०१९ हे वर्ष चांगलं गेलेलं आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत रोहितने धडाकेबाज खेळ करत ५ शतकं नोंदवली होती. यानंतर रोहितला कसोटी क्रिकेटमध्येही सलामीला येण्याची संधी देण्यात आली. रोहितनेही दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत आक्रमक खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. रोहितच्या या खेळीचा कॉर्पोरेट कंपन्यांनी चांगलाच फायदा घेतलेला दिसतोय. वाचा सविस्तर…

काजोलने नंबर दिला पण…

आजकाल बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. कधी कधी बॉलिवूड कलाकार सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद देखील साधतात. नुकताच अभिनेत्री काजोलने देखील चाहत्यांशी संवाद साधला आहे. चाहत्यांनी ही संधी न दवडता काजोलला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यात एका चाहत्याने चक्क तिचा मोबाईल नंबरही मागितला आहे. मात्र त्यावर काजोलने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. वाचा सविस्तर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 9:36 am

Web Title: morning bulletin top five news avb 95 22
Next Stories
1 गांधी परिवाराला धोका कमी झाला हे नक्की कोणाला वाटतं ?; शिवसेनेचा सवाल
2 हैदराबादमध्ये महिलेला जाळल्याप्रकरणी चौकशी
3 माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कुमारस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा
Just Now!
X