28 September 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

आझम खान मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांना कठोर शिक्षा व्हावी; सुषमा स्वराज भडकल्या

‘आझम खान यांनी गैरवर्तन करण्याची सर्वच मर्यादा ओलांडली’

माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्यावर चांगल्याच भडकल्या आहेत. आझम खान यांनी लोकसभेत केलेल्या वादग्रस्त विधानावर संताप व्यक्त करताना, आझम खान मानसिकदृष्ट्या विकृत असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वाचा सविस्तर…

लोकसभा, विधानसभांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक!

महिलांचा सन्मान करणे ही आपली परंपरा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी मुंबईत केले. वाचा सविस्तर..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन झाले आहे. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाचा सविस्तर..

भारत ‘अ’ संघाचा दणदणीत विजय

डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीमच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्या दिवशी सहा गडी राखून जिंकला. वाचा सिस्तर..

Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे करते याला डेट

बिग बॉस मराठी पर्व २मध्ये काही दिवसांपूर्वीच आजारपणाचे कारण देऊन घरातून बाहेर पडलेल्या शिवानी सुर्वेची घरात पुन्हा एण्ट्री झाली. त्यामुळे घरातील काही सदस्यांना आनंद झाला तर काहींना शिवानीचे येणे आवडले नाही. स्पष्टवक्तेपणाने आपला मुद्दा मांडणे, घरामध्ये अनेक वेळा वाद घालणे आणि तेवढ्याच ताकदीने दिलेला टास्क पूर्ण करणे यासाठी शिवानी सुर्वे खास ओळखली जाते. नुकताच वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या एका क्लिपमध्ये शिवानी किशोरी शहाणे यांना तिने आणि तिच्या बॉयफ्रेंडने काढलेल्या टॅट्यूबद्दल सांगताना दिसली. वाचा सविस्तर..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 10:22 am

Web Title: morning bulletin top five news avb 95 3
Next Stories
1 आझम खान मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांना कठोर शिक्षा व्हावी; सुषमा स्वराज भडकल्या
2 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन
3 कर्नाटक विधानसभाध्यक्षांवर अविश्वास?
Just Now!
X