27 February 2021

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

महाभरती बंद नाही, चांगल्या लोकांचे स्वागतच!

मुळात आमच्या पक्षाच्या तुलनेत इतर पक्षांतील केवळ अर्धा टक्के नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.

वर्धा : भाजपमध्ये सुरू असलेली महाभरती बंद केलेली नाही. चांगले लोक येत असतील तर जरूर पक्षात घेऊ, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. वाचा सविस्तर…

अमरनाथ यात्रा रद्द!

श्रीनगर : पाकिस्तानी अतिरेक्यांकडून अमरनाथ यात्रेत मोठा घातपात केला जाण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने शुक्रवारी दिल्यानंतर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने ही यात्रा रद्द केली आहे. यात्रेकरू तसेच पर्यटकांनी शक्य तितक्या तातडीने काश्मीर सोडावे, असे सूचनावजा आदेशही प्रशासनाने दिले आहेत. वाचा सविस्तर..

सौदी अरेबियात पुरुषांच्या परवानगीविना महिलांना परदेश प्रवासाची मुभा

रियाध : पुरुष पालकांच्या परवानगीशिवाय परदेश प्रवासाला जाण्याची मुभा सौदी अरेबियातील महिलांना देण्यात आली आहे. महिलांना परदेश प्रवासासाठी पुरुषांची परवानगी आवश्यक असल्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर सौदी अरेबियावर ताशेरे ओढण्यात आले होते. वाचा सविस्तर..

भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका : नव्या अध्यायाचा प्रारंभ!

विश्वचषक पटकावण्याचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आता या धक्क्यातून सावरून नव्या अध्यायाची सुरुवात करावी लागणार आहे. शनिवारपासून फ्लोरिडा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेद्वारे पुन्हा एकदा विजयपथावर येण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे. वाचा सविस्तर..

दीपिका हॉटेलमधून चोरायची ‘ही’ वस्तू

आपल्या आयुष्यात मैत्रीचे नाते हे फार महत्वाचे असते. कधी कधी आपल्या मनात असलेल्या भावना किंवा काही गोष्टी आपण आपल्या कुटुंबीयांसोबत शेअर करत नाही. मग अशा वेळी आपण त्या गोष्टी आपल्या मित्रमैत्रीणींसोबत शेअर करतो. त्यामुळे आपल्या खास मित्राला आपल्या सगळ्या खाजगी गोष्टी माहिती असतात. बॉलिवूड कलाकरांमध्ये ही अशी मैत्री पाहायला मिळते. अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या खास मैत्रीणीने दीपिकाच्या आयुष्यातील काही रहस्य उलघडली आहेत. वाचा सविस्तर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 10:23 am

Web Title: morning bulletin top five news avb 95 8
Next Stories
1 ‘या’ कंपनीची ३जी सेवा होणार बंद
2 काश्मीरमध्ये शांतता पाळा, अफवांवर विश्वास ठेऊ नका, राज्यपालांचे आवाहन
3 दहशतवादविरोधी कायद्याचा दुरुपयोग होणार नाही!
Just Now!
X