मूकबधिर आंदोलनकर्त्यांवरील लाठीमारची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मागितला सखोल अहवाल
आपल्या न्याय-हक्कांसाठी पुण्यातील समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या लाठीमारप्रकरणी सखोल अहवाल त्यांनी मागितला आहे. वाचा सविस्तर

‘भारताने हल्ला केला तर पाकिस्तान जशास तसे उत्तर देण्यास सज्ज’

भारताने हल्ला केला तर आम्ही जशास तसे उत्तर देण्यास सज्ज आहोत असे वक्तव्य पाकिस्तानी लष्कराने प्रसारित केले आहे. पाकिस्तानच्या लष्कर आणि हवाई दलाची बैठक सोमवारी पार पडली त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि एअर चीफ मार्शल मुजाहीद अन्वर खान यांच्यात ही बैठक पार पडली. भारताने हल्ला केला तर त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत असे या दोघांनी म्हटल्याचे एका ट्विटमधूनही सांगण्यात आले आहे. वाचा सविस्तर

नाहीतर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगाऐवजी लोक दुसरा झेंडा हाती घेतील: मेहबुबा मुफ्ती

काश्मीरमध्ये जमीन आणि स्थायी निवास यावर विशेष दर्जा देणारे कलम ३५ अ (Article 35 A) संपुष्टात आणले जाण्याच्या शक्यतेवरून आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी इशारा दिला आहे. पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, आगीशी खेळू नका, ‘कलम ३५ अ’ शी छेडछाड करू नका, नाहीतर १९४७ पासून आतापर्यंत तुम्ही जे पाहिले नाही ते पाहाल. जर असे झाले तर मला माहीत नाही की जम्मू-काश्मीरचे लोक तिरंगा घेण्याऐवजी हाती कुठला झेंडा घेतील ? अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे. वाचा सविस्तर

‘धारावी’साठी रेल्वेची ४५ एकर जमीन

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ४५ एकर जागा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या जागेत सध्या असलेल्या रेल्वेच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार असून रेल्वे कर्मचाऱ्यांसह धारावीतील नागरिकांनाही यात घर मिळेल. वाचा सविस्तर

अंतर्गत मतभेद विसरुन केवळ पक्षनिष्ठेला महत्त्व द्यावे!

आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षातील अंतर्गत मतभेद विसरून केवळ पक्षनिष्ठेला महत्त्व देत गल्ली तसेच मुंबईतून लोकशाहीला मारक असलेले ‘ठोकशाही’ सरकार सत्तेतून पायउतार करावे. यासाठी एकदिलाने काम करण्याची गरज असून जात-धर्म याचे राजकारण करू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. वाचा सविस्तर