सत्तेवर येण्याआधीचे आक्रमक हिंदुत्व नंतर आळूच्या फतफत्यासारखे का झाले? – उद्धव ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तेवरील बेगडी हिंदुत्ववाद्यांची महत्त्वाकांक्षा आहे ती हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची, हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात दहशतवादी ठरवून खतम करण्याची. शिकागोतील हिंदू काँग्रेसमध्ये भागवत यांनी या विषयावर भाष्य केले असते तर बरे झाले असते असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. भाजपची काँगेस झाली आहे. वाचा सविस्तर

सलग १७ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण असताना सलग १७ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल १४ तर डिझेल १५ पैशांनी महागलं आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८८.२६ रुपये प्रतिलिटर झला असून डिझेलचा दर ७७.४७ रुपये प्रतिलिटर झाला आहे. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी २३ पैशांची वाढ झाली होती. वाचा सविस्तर

जम्मू-काश्मीर : दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंडवाडा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. आज पहाटे हंडवाडा येथील गुलोरा परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली, या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कराकडून सध्या परिसरात शोधमोहिम सुरू आहे. वाचा सविस्तर

मुलींची सुरक्षितता आता शाळांच्या शिरावर!

मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येऊन सरकार व सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठू लागल्यामुळे आता शाळकरी मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा झटून कामाला लागल्या आहेत. वाचा सविस्तर

गणेशभक्तांची सोय , गणपती स्पेशल ट्रेनना जादा डबे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने गणपती स्पेशल गाडयांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून सोडलेल्या चार गणपती स्पेशल गाडय़ांना प्रत्येकी तीन अनारक्षित द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. ट्विटरद्वारे मध्य रेल्वेने याबाबत माहिती दिली. वाचा सविस्तर

राज्य-देश-विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांसह दिवसभरातील सर्व बातम्यांचे अपडेट्स तुम्ही लोकसत्ता.कॉमवर पाहू शकणार आहात. क्लिक करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning top five news bulletin shivsena petrol rates jammu kashmir ganpati
First published on: 11-09-2018 at 08:49 IST