पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांची पार्थिवं दिल्लीच्या पालम विमातळावर दाखल झाली आहेत. या ठिकाणाहून ही पार्थिवं जवानांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत. या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही उपस्थिती आहे.

पुलवामा या ठिकाणी CRPF जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात चाळीस जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या हल्ल्याचा देशातील सर्व स्तरातून निषेध होतो आहे. तसेच शहीद जवानांच्या नातेवाईकांना मदतही जाहीर करण्यात आली आहे. आता या जवानांची पार्थिवं दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आली आहेत. या ठिकाणाहून ही पार्थिवं जवानांच्या मूळ गावी रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लष्करप्रमुख बिपिन रावत यांची या ठिकाणी हजेरी आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या सगळ्यांची दिल्ली विमातळावर उपस्थित आहेत. या ठिकाणी शहीद जवानांना मानवंदना देण्यात येईल.

ज्या राज्यात जवानांची पार्थिवं पाठवण्यात येणार आहेत तेथील मुख्यमंत्र्यांनी या जवानांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर रहावे अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.