परदेशातील सव्‍‌र्हर्सच्या मदतीने माहितीचे ‘हॅकिंग’ करण्यात आल्याचा आरोप
जगातील अनेक बडे राजकारणी तसेच वलंयाकित व्यक्ती यांनी परदेशात गुंतवणूक केलेल्या काळय़ा पैशांबाबतचे पनामा पेपर्स म्हणजे आमच्या संस्थेकडील या व्यक्तींची असलेली माहिती हॅकिंगच्या माध्यमातून चोरण्याचा प्रकार आहे. परदेशातील सव्‍‌र्हर्सच्या मदतीने ही माहिती हॅक करण्यात आली, असे पनामातील मोझ्ॉक फोन्सेका या कायदा सल्लागार कंपनीने म्हटले आहे. या कंपनीनेच अनेकांना परदेशात बोगस कंपन्या व खाती उघडण्यास मदत केली होती. कंपनीचे सहसंस्थापक रॅमन फोन्सेका यांनी सांगितले, की आम्ही पनामा पेपर्स फुटीच्या प्रकरणात सोमवारी फौजदारी स्वरूपाची फिर्याद दाखल केली आहे. आतापर्यंत याबाबत जे वार्ताकन झाले आहे त्यात कुणीही ही माहिती हॅकिंगच्या मार्गाने मिळवली असल्याचे कबूल केलेले नाही व माहितीचे हॅकिंग करून संबंधितांनी गुन्हा केला आहे.
‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने पाठवलेल्या प्रश्नावलीला उत्तरे देताना फोन्सेका यांनी म्हटले आहे, की आम्ही फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. आम्हाला जो तांत्रिक अहवाल मिळाला आहे त्यानुसार परदेशातील सव्‍‌र्हर्सच्या माध्यमातून माहितीचे हॅकिंग करण्यात आले आहे. फोन्सेका यांनी नेमके कुठल्या देशाने हॅकिंग केले हे मात्र सांगितलेले नाही. एकूण ११.५ दशलक्ष कागदपत्रांचे हॅकिंग झाले असून, ती कागदपत्रे मोझ्ॉक फोन्सेका या विधी सल्लागार कंपनीच्या संगणकातील आहे व ती बडे राजकीय नेते, क्रीडापटू, अभिनेते आदी ग्राहकांच्या संदर्भातील आहे. या कंपनीनेच त्यांना परदेशात बेनामी कंपन्या व खाती उघडून काळा पैसा दडवण्यास मदत केली होती. व्यक्तिगतता किंवा खासगीपणा हा मूलभूत अधिकार आहे हे जग स्वीकारत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते. हॅकिंग प्रकारामुळे आर्थिक सेवांना फटका बसत आहे व उद्योगांची विश्वासार्हता धोक्यात येत आहे. परदेशात उघडलेल्या कंपन्या बेकायदेशीर नाहीत व मोझ्ॉक फोन्सेका त्यांच्या ग्राहकांनी कंपन्यांचा वापर कशासाठी केला याला जबाबदार नाही असा दावा करण्यात आला आहे.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी