News Flash

#CAA: शाहीन बागमधील बहुतांश आंदोलक पाकिस्तानी आणि बांगलादेशी – भाजपा

सीएएविरोधात शाहीन बाग येथे महिन्यापेक्षा अधिक काळापासून महिलांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे.

#CAA: शाहीन बागमधील बहुतांश आंदोलक पाकिस्तानी आणि बांगलादेशी – भाजपा
नवी दिल्ली : येथील शाहीन बाग येथे सीएएविरोधात आंदोलन करीत असलेल्या महिला.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीतील शाहीन बाग येथे ठिय्या आंदोलनासाठी बसलेले बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी असल्याचा दावा भाजपाने केला आहे. भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे.

सिन्हा यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीन बाग येथील आंदोलनावर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते, “शाहीन बाग हा आता शहराचा भाग राहिलेला नाही तर एक विचार बनला आहे. जिथे राष्ट्रध्वजाचा उपयोग देशाचे विभाजन करु पाहणाऱ्या लोकांना लपवण्यासाठी केला जात आहे. टुकडे-टुकडे गँगचे या आंदोलकांना समर्थन आहे.”

दरम्यान, यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते, “शाहीन बागमध्ये रस्ता बंद करण्यात आल्याने लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाजपा यावरुन घाणेरडं राजकारण करीत आहे. त्यांची इच्छा नाही की हा रस्ता मोकळा व्हावा. भाजपा नेत्यांनी तत्काळ शाहीन बाग येथे भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करुन हा रस्ता पुन्हा खुला करावा.” केजरीवालांच्या या सल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला आवाहन केले होते की, “जर दिल्लीला चांगल्याप्रकारे सजवायचं असेल तर भाजपाला मतं द्या. जर अस झालं तर याचा थेट परिणाम शाहीन बागच्या आंदोलनावर होईल.” दरम्यान, शाह यांनी काँग्रेस आणि आपवर दिल्लीत दंगली घडवणे, हिंसाचार पसरवणे आणि लोकांना भडकवण्याचा आरोपही केला होता.

सीएएविरोधात शाहीन बाग येथे महिन्यापेक्षा अधिक काळापासून महिलांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आमच्याशी येऊन चर्चा करावी आणि हा कायदा रद्द करावा अशी या आंदोलकांची मागणी आहे. त्यामुळे हे आंदोलन देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 9:14 am

Web Title: most of the people sitting in shaheen bagh are come from bangladesh and pakistan says bjp leader rahul sinha aau 85
Next Stories
1 तुमचा धर्म कोणता? सरकार ‘या’ कारणासाठी मागणार प्रमाणपत्र
2 ‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’; शिवसेनेची सरकारवर टीका
3 नागरिकत्व कायद्याविरोधात बंगालचाही ठराव
Just Now!
X