News Flash

नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर आईने प्रियकराच्या मदतीने केली मुलीची हत्या

अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या १७ वर्षाच्या पोटच्या मुलीची गळा चिरुन हत्या केली. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील धामा गावात ही धक्कादायक घटना घडली.

( संग्रहीत छायाचित्र )

अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या १७ वर्षाच्या पोटच्या मुलीची गळा चिरुन हत्या केली. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील धामा गावात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने गळा चिरताना मुलीच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकणी आरोपी कनकू ठाकोर (३५) आणि उमंग ठक्कर (३७) या दोघांना अटक केली आहे.

कनकू उमंग ठक्करच्या निवासस्थानी घरकाम करायची. त्यावेळी दोघांच्या मनात परस्परांबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. कनकूची मुलगी सोनलने दोघांना प्रणयक्रीडा सुरु असताना रंगेहाथ पकडले त्यामुळे त्यांनी तिला संपवले. सोनल अनेकदा तिच्या आईसोबत उमंगच्या घरी जायची. बुधवारी सोनल जेव्हा उमंगच्या घरी गेली तेव्हा तिने तिच्या आईला आणि उमंगला नको त्या अवस्थेत पाहिले.

सोनलने बाहेर कुठे वाच्यता केली तर बदनामी होईल या भितीने दोघांनी सोनलची निघृर्णपणे हत्या केली अशी माहिती तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली. कनकू आणि उमंगने सोनमला पकडले व घरातल्या चाकूने तिचा गळा चिरला त्यानंतर तिच्या पोटात चार ते पाच वार केले त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

सोनल आणि कनकू बुधवारी रात्री घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. जेव्हा कुटुंबिय उमंगच्या घरी पोहोचले तेव्हा सोनलचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडलेला होता. सोनलचा चुलत भाऊ विष्णू ठाकोर यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी आपल्या गुन्ह्यची कबुली देत कशी हत्या केली ते पोलिसांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 3:44 pm

Web Title: mother killed daughter with lovers help
टॅग : Love
Next Stories
1 चारित्र्यहिन ‘संजू’वर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाची टीका
2 लग्नाचा खर्च जाहीर करण्याची सक्ती करा – सर्वोच्च न्यायालय
3 हिंदू पाकिस्तानच्या वादाबाबत शशी थरूर म्हणतात ‘कुछ तो लोग कहेंगे!’
Just Now!
X