आर्थिक संकटात अडकल्याने तसंत दोन वेळच्या अन्नाची व्यवस्थाही करु शकत नसल्याने आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला असून याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महिलेला अजून दोन मुलं असून मुलीच्या भविष्याची चिंता तिला सतावत होती.
महिलेला भविष्यात मुलीच्या लग्नाचा खर्च कसा उचलणार याची काळजी लागली होती. उषा देवी असं या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. याशिवाय दोन वेळच्या अन्नाची व्यवस्थाही ते करु शकत नव्हते. मजूर असणाऱ्या पतीच्या अपघातानंतर महिलेवर कुटुंबाची जबाबदारी आली होती. महिलेचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 10:40 am