17 January 2021

News Flash

आईची माया! मृत पिल्लाला घेऊन देवमासा दोन आठवडे फिरतोच आहे

दोन आठवड्यांपासून हा देवमासा आपल्या मृत पिल्लाला घेऊन फिरतो आहे, कदाचित आपलं पिल्लू काहीतरी प्रतिसाद देईल अशी वेडी आशाच या आईला आहे

आई आणि मूल यांचे नाते हे जगातले सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. आपले मूल जगावे असे प्रत्येकच आईला वाटते. प्राणी, पक्षी, मासेही याला अपवाद नाहीत. एका देवमाशाची अशीच काहीशी कहाणी आहे. या देवमाशाचे पिल्लू दोन आठवड्यांपूर्वीच दगावले आहे. मात्र दोन आठवड्यांपासून हा देवमासा आपल्या मृत पिल्लाला घेऊन फिरतो आहे. कदाचित आपलं पिल्लू काहीतरी प्रतिसाद देईल या वेड्या आशेवर.

ही घटना आहे वॉशिंग्टनच्या ऑलिम्पिक पेनइनसुला येथील. नोआ फिशरीजचे प्रवक्ते मायकल मिलस्टिन यांनी या देवमाशाच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. २० वर्षांच्या या व्हेलने (देवमासा) जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पिल्लाला जन्म दिला. मात्र हे पिल्लू २४ जुलैला दगावले. मात्र त्याच्या आईने पिल्लाचा मृत्यू मान्यच केलेला नाही. ती गेल्या दोन आठवड्यांपासून आपल्याला पिल्लाला घेऊन फिरते आहे असेही मायकल यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला आता या व्हेलच्या प्रकृतीची काळजी आहे. जेव्हा या पिल्लाचा जन्म झाला तेव्हा त्याची त्वचा खूपच पातळ होती त्यामुळे ते बुडू लागले. ते पिल्लू बुडाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला मात्र त्याच्या आईने त्याला बाहेर काढले.

तेव्हापासून ती त्याला घेऊन फिरतेच आहे. आता तिच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते आहे असे सॅन जुआन येथील व्हेल रिसर्चचे वरिष्ठ संशोधक केन बालकोब यांनी म्हटले आहे. या देवमाशाला वाटते आहे की आपले पिल्लू जिवंत आहे आणि ते कधीतरी प्रतिसाद देईल. एवढ्या एका वेड्या आशेनेच ती त्या पिल्लाचा मृतदेह घेऊन फिरते आहे. आम्ही तिची परिस्थिती पाहतो आहोत आणि ती खरोखरच क्लेशदायक आहे असेही केन यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 7:09 pm

Web Title: mother of dead whale still carrying its body after 2 weeks
Next Stories
1 संसदेत अवतरला ‘हिटलर’, खासदार झाले चकीत!
2 FB बुलेटीन: मराठा आंदोलन अपडेट्स, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे आणि अन्य बातम्या
3 Triple Talaq : आरोपीला जामीन देण्याचा न्यायाधीशांना अधिकार, मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब
Just Now!
X