News Flash

केरळमधील बेपत्ता गर्भवतीच्या आईचे केंद्र सरकारला साकडे

निमिषा हिने इस्लाम धर्म विवाहानंतर स्वीकारला होता.

| July 14, 2016 12:25 am

केरळमधील दोन ठिकाणाहून बेपत्ता झालेले २१ जण आयसिसला सामील झाल्याचा संशय असतानाच बेपत्ता लोकांमध्ये समावेश असलेल्या एक गर्भवती महिलेच्या आईने केंद्रीयमंत्री थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन त्यांच्या बेपत्ता मुलीचा शोध घेण्याची मागणी केली. पंचवसी वर्षे वयाच्या फातिमा निमिषा हिची आई बिंदू हिने केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. निमिषा हिने इस्लाम धर्म विवाहानंतर स्वीकारला होता. गेहलोत यांनी सांगितले की, मुलीच्या आईने जी मागणी केली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातली जाईल. बिंदू हिने म्हटले आहे की,माझी मुलगी एक महिन्यापासून बेपत्ता असून आम्ही तिचा शोध घेऊनही सापडलेली नाही. १६ व १८ मे दरम्यान निमिषा तिच्या पतीसह भेटायला आली होती. नंतर श्रीलंकेला जात असल्याचा निमिषाचा फोन आला, त्यानंतर तिचा काहीच ठावठिकाणा समजलेला नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सांगितले की, बेपत्ता असलेल्या केरळी लोकांचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून केंद्र सरकारच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केरळमधून बेपत्ता झालेले हे सर्व जण आयसिसच्या बाजूने लढण्याकरिता गेले असल्याची चर्चा असताना सरकारने ते फक्त बेपत्ता असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री विजयन यांनी ते आयसिसकडे गेले असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यातील सतरा जण कसरगोडचे तर चार जण पलक्कडचे आहेत, असे प्राथमिक माहितीत निष्पन्न झाले आहे, असे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सांगितले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 12:25 am

Web Title: mother of suspected isis recruit meets union minister thaawar chand gehlot
Next Stories
1 राष्ट्रीय अपील न्यायालय स्थापन करण्याची याचिका घटनापीठाकडे वर्ग
2 कॅलिफोर्नियातील शालेय पुस्तकात हिंदुत्वाचे चुकीचे चित्रण नको
3 अखुंडजादा याचा अजून तरी तालिबानवर फारसा प्रभाव नाही
Just Now!
X