News Flash

दहा डॉलरच्या नोटेवर मदर तेरेसांचे छायाचित्र हवे

थॅचर या अमेरिकी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या भागीदार होत्या.

अमेरिकी अध्यक्षीय उमेदवारीसाठी शर्यतीतील उमेदवाराचे मत
नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांचे छायाचित्र १० डॉलर्सच्या नोटेवर असले पाहिजे असे मत अमेरिकेत अध्यक्षीय उमेवारीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून शर्यतीत असलेल्या उमेदवाराने व्यक्त केले आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय चर्चेचे आयोजन करण्यात आले असता एका महिलेने अ‍ॅलेक्झांडर हॅमिल्टन यांच्या जागी १० डॉलरच्या नोटेवर कुणाचे छायाचित्र आणले जाईल, असे विचारले होते. नोटेची फेररचना २०२० मध्ये केली जाणार आहे. त्यावर ओहिओचे गव्हर्नर जॉन कासिच यांनी सांगितले की, हे कायदेशीर नाही पण आपल्या मते मदर तेरेसा यांचे छायाचित्र त्या नोटेवर टाकले जावे, असे आपल्याला वाटते. मदर तेरेसा यांना १९७९ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते तसेत २००३ मध्ये त्यांना संतपदही देण्यात आले होते. त्या तीस वर्षे युगोस्लाव्हियात होत्या व नंतर १९२९ मध्ये भारतात आल्या. त्यांनी नंतरचे आयुष्य भारतातच घालवले. फ्लोरिडाचे माजी गव्हर्नर जेब बुश यांनी सांगितले की, माजी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे छायाचित्र नोटेवर असावे असे आपल्याला वाटते. थॅचर या अमेरिकी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या भागीदार होत्या. डोनाल्ड ट्रम्प, मार्को रूबियो, टेड क्रूझ यांनी आफ्रिका-अमेरिकी नागरी हक्क कार्यकर्त्यां रोझा पार्क यांचे छायाचित्र नोटेवर असावे असे मत व्यक्त केले. रोझा पार्कस यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठी भूमिका पार पाडली होती. कार्ली फियोरिना यांनी नोटेवर कुणाचे छायाचित्र असावे यावर काहीच मत व्यक्त केले नाही. आपण १० डॉलरची नोट बदलणार नाही व वीस वीस डॉलरचीही बदलणार नाही, त्यामुळे इतिहास बदलत नसतो. या देशात महिलांना ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळीच त्याची क्षमता पुढे येईल असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2015 3:40 am

Web Title: mother teresa photo on ten dollars note
टॅग : Mother Teresa
Next Stories
1 दिल्लीत डेंग्यूचे दोन हजार रुग्ण
2 चिलीत भूकंपाचा मोठा धक्का; ८ ठार
3 बंद खाण सुरू करण्यासाठी अडीच कोटींची लाच
Just Now!
X