व्हॅटिकन येथील पोप फ्रान्सिस यांनी मंगळवारी मदर तेरेसा यांचा दुसरा चमत्कार मान्य करून त्यांना संतपद मिळाल्याचे जाहीर करताच तेरेसा यांनी स्थापन केलेल्या कोलकाता येथील मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेत त्यांच्या समाधीवर आदरांजली वाहिली. २ ऑक्टोबरला कोलकात्यातील नेताजी स्टेडियममध्ये प्रार्थना आयोजित केली आहे. तेरेसा यांना संत म्हणून मान्यता देत असल्याचा अधिकृत संदेश मंगळवारी व्हॅटिकनकडून कोलकात्यात मिळाला. तेरेसा यांना चर्चतर्फे संत म्हणून घोषित करून त्यांच्या नावाचा संतांच्या अधिकृत यादीत समावेश करण्याचा कार्यक्रम ४ सप्टेंबरला रोम येथे होणार आहे.