News Flash

मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी सिस्टर निर्मला जोशी यांचे निधन

शांततेच्या नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी व मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख सिस्टर निर्मला जोशी (वय ८१) यांचे आज सकाळी येथे निधन झाले.

| June 24, 2015 03:10 am

शांततेच्या नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा  यांच्या उत्तराधिकारी व मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख सिस्टर निर्मला जोशी (वय ८१) यांचे आज सकाळी येथे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सिस्टर निर्मला यांनी गरिबांची सेवा करण्यासाठी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो असे मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिस्टर निर्मला यांची प्रकृती बरी नव्हती व गेल्या काही दिवसात ती आणखी घसरली. त्यांचा पार्थिव देह उद्या मदर हाऊस येथे आणला जाणार आहे. सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येतील. ज्यांना सिस्टर निर्मला यांना श्रद्धांजली वाहायची असेल त्यांनी उद्या मदर हाऊस येथे यावे असे सांगण्यात आले. मदर तेरेसा यांच्या मृत्यूच्या सहा महिने अगोदर म्हणजे १३ मार्च १९९७ रोजी सिस्टर निर्मला यांची  मिशनरीज ऑफ चॅरिटीजच्या सुपिरियर जनरल म्हणून निवड झाली होती.
सिस्टर मेरी प्रेमा यांची सिस्टर निर्मला यांच्या जागी कोलकाता येथील एप्रिल २००९ च्या अधिवेशनात उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिस्टर निर्मला यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2015 3:10 am

Web Title: mother teresas successor sister nirmala joshi passes away
टॅग : Mother Teresa
Next Stories
1 सहा आरोपींच्या अटकेची हमी मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांचा नकार
2 अमेरिकेचा वंशवादाचा इतिहास अद्याप कायम -बराक ओबामा
3 कृत्रिम निर्मितीतून गर्भारपणातील कार्य समजण्यास मदत
Just Now!
X