25 November 2020

News Flash

सर्वहिताय ही संकल्पना भारतीय संस्कृतीच्या मुळाशीच- मोदी

श्रेष्ठपणाची भावना ही लोकांमध्ये वाद निर्माण करते.

PM Modi : अंतर्मनात डोकावून आपण स्वत:चा विकास कसा करू शकतो, हे पाहा, असे मोदींनी यावेळी सांगितले

सर्वहिताय हा संस्कार भारतीय संस्कृतीच्या मुळाशी खोलवर रूजला असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी उज्जैन येथील कार्यक्रमात बोलत होते. आपण अशा संस्कृतीचा भाग आहोत की, जिथे साधा भिक्षुकही मला भिक्षा देणाऱ्याचे आणि न देणाऱ्याचेही भले होऊ दे, असे म्हणतो. प्राचीन भारतीय संस्कृती आधुनिक काळातील अनेक प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे. फक्त आपण स्वत:वर विश्वास ठेवणे आणि विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. श्रेष्ठपणाची भावना ही लोकांमध्ये वाद निर्माण करते. त्यामुळे अंतर्मनात डोकावून आपण स्वत:चा विकास कसा करू शकतो, हे पाहा, असे मोदींनी यावेळी सांगितले. सध्या पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडील निवडणूक प्रक्रिया जगातील एक आश्चर्य असल्याचे म्हटले. इतका मोठा देश आणि एवढे मतदार व निवडणूक आयोगाकडून करण्यात येणारे निवडणुकांचे व्यवस्थापन जगासाठी औत्स्युकाचे असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2016 3:02 pm

Web Title: motto of good for all deep rooted in indian culture pm modi at simhasth kumbh
टॅग Narendra Modi,Pm
Next Stories
1 भारतीय सीमेवरील चीनी लष्कराच्या संख्येत लक्षणीय वाढ- पेंटॅगॉन
2 आरोपपत्रानंतर ‘आरोप’ भाजप-काँग्रेसची एकमेकांवर टीका
3 ‘आता पाकिस्तानला आवरण्याची वेळ’
Just Now!
X