भारतातील२०१२ या वर्षांतील डिजिटल माहितीची निर्मिती ही अ‍ॅपल आयफोन-५ मध्ये साठवली तर या फोनचे ५१०० स्टॅक (थप्प्या) तयार होतील, आयफोनची स्मृती क्षमता ही ३२ जीबी आहे. इएमसी-आयडीसीच्या अभ्यासात हे निष्पन्न झाले आहे. ही माहिती भरून आयफोनचे स्टॅक जर एकावर एक रचले तर त्यांची उंची माउंट एव्हरेस्ट पर्वता इतकी (८८४८ मीटर ) होईल एवढय़ा प्रचंड स्वरूपात ही माहिती आहे, असा निष्कर्ष आयडीसी-इएमसी यांच्या संयुक्त सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
भारताच्या अंकीय  माहितीतील वाढ ही २०१२-  असण्याची शक्यता आहे   त्याची कारणे खालीलप्रमाणे
* इंटरनेटचा वाढता वापर, २ सोशल नेटवर्किंग
* स्मार्ट फोनचा वाढता ग्राहक वर्ग
* तंत्रज्ञानाची कमी होत जाणारी किंमत.
* डिजिटायझेशन.

* दरवर्षी भारतात निर्मिती होणाऱ्या किंवा वापरल्या जाणाऱ्या डिजिटल बिटसची संख्या २०१२ ते  २०२० या काळात १२७ एक्सॅबाइट पासून २.९ झेटाबाईट पर्यंत वाढेल.
* एक एक्सॅबाइट म्हणजे एकावर १८ शून्य तर एक झेटाबाईट म्हणजे एकावर २१ शून्य.
* भारतात केवळ अर्धा टक्का माहितीचे विश्लेषण होते तर ३६ टक्के माहिती ही उपयोगाची असते.

वाढता वाढता वाढे
* २०१२ मधील डिजिटल जगात ३.४ एक्साबाईटसाठी  केवळ १ एक्साबाईट साठवण क्षमता उपलब्ध होती ती २०२० पर्यंत दर एक्साबाईटला ९.४ एक्साबाईट इतकी असेल. आताच्या तुलनेत ही वाढ तीन पट असेल.
* ४२ टक्के माहिती क्लाउडवर असेल २ डिजिटल माहिती व्यवस्थापन खर्च  भारतात एक  जीबी माहितीसाठी ०.८७ डॉलर. (चीन, अमेरिका,   पश्चिम युरोपपेक्षा हा खर्च खूपच कमी आहे)

भारतातील डिजिटल माहितीचा वापर हा फार वेगाने वाढत आहे त्या तुलनेत आपण तंत्रज्ञानात केलेली गुंतवणूक कमी आहे. केवळ अर्धा टक्का माहितीचेच सध्या विश्लेषण होते. उद्योग व सरकार यांनी डिजिटल माहितीच्या वापर व विश्लेषणावर भर द्यायला हवा.
– राजेश जानी,
अध्यक्ष इएमसी इंडिया.

कंपन्या सध्या डिजिटल माहितीचा पुरेसा वापर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्राहकांच्या गरजा त्यासाठी ओळखाव्या लागत आहेत. ग्राहकांना माहिती उपलब्ध व्हावी यासाठी क्लाउड स्टोरेजचा वापर करण्याकडे कंपन्यांचा कल आहे.
– वेणू रेड्डी,
 संचालक आयडीसी इंडियारीसर्च