News Flash

मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रोहनींचे निधन

मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ईश्वरदास रोहनी (वय ६७) यांचे हृदयविकाराने निधन झाले. जबलपूर कॅन्टोन्मेंट

| November 6, 2013 04:26 am

मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ईश्वरदास रोहनी (वय ६७) यांचे हृदयविकाराने निधन झाले. जबलपूर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सलग चार वेळा ते निवडून आले होते. २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली होती. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. आणीबाणीच्या काळात १९ महिने ते तुरुंगात होते. १९९८ मध्ये ते विधानसभेचे ते उपाध्यक्ष होते. २००३ मध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:26 am

Web Title: mp assembly speaker rohani passes away
Next Stories
1 आयएमसीसमवेत युतीमुळे केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात
2 ‘नेहरूंनी वल्लभभाईंना जातीयवादी म्हटले होते’
3 सत्ताबाजार
Just Now!
X