News Flash

MP: करोनाच्या भीतीने रॉकेल प्यायला; मृत्यूनंतर रिपोर्ट आला निगेटीव्ह

मित्राचा सल्ला पडला महाग आणि गमवाला जीव

देशात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी करोनामुळे बळी पडण्याऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. काही जणांनी करोनाची इतकी धास्ती घेतली आहे की, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचललं जात आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्येही असाच एक प्रकार घडला. करोनाच्या भीतीने एकाने मित्राचा सल्ला ऐकला आणि रॉकेल प्यायला. हा जालीम उपाय मात्र त्याच्या जीवावर बेतला.

मध्य प्रदेशातील भोपाळमधल्या अशोक गार्डन भागात मृत महेंद्र हा टेलरिंगचं काम करायचा. काही दिवसांपूर्वी त्याला ताप आला होता. त्यामुळे आपल्याला करोना झाल्याची भीती त्याच्या मनात बसून गेली होती. रोजच येणाऱ्या करोनाच्या बातम्यांमुळे तो चिंतेत होता. त्याला कायम वाटत होतं की आपल्याला करोना झाला आहे. रुग्णालयातील स्थिती पाहता त्याने तर करोनाचा जास्तच धसका घेतला आणि याबाबत आपल्या मित्राला सांगितलं. मित्राने करोनातून बरा होण्यासाठी त्याला जालीम उपाय सांगितला. मात्र हा उपाय त्याच्या जीवावर बेतला. मित्राने त्याला रॉकेल प्यायल्याने करोना बरा होतो असं सांगितलं. हा सल्ला मृत महेंद्रने इतका मनावर घेतला की, तात्काल रॉकेल प्यायला. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. रॉकेल प्यायल्याने त्याची प्रकृती आणखी खालवली. कुटुंबियांना सुरुवातीला काही कळलंच नाही. त्यांनी तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. उपचारांना साथ देत नसल्याने तिथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

धक्कादायक! औषधं आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाची जमावाकडून हत्या; झुंडबळीचा कुटुंबाचा आरोप

रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत महेंद्रचे करोना चाचणीसाठी नमुने घेतले होते. त्यात त्याची करोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे कुटुंबियांना आणखीच धक्का बसला आहे. मनात शंका असतानाच करोना चाचणी केली असती तर हा प्रकार घडला नसता असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

Coronavirus : २४ वर्षीय जुळ्या भावांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू

देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:41 pm

Web Title: mp bhopal man dies after scare of corona drunk kerosene and dies rmt 84
टॅग : Corona,Madhya Pradesh
Next Stories
1 Cyclone Tauktae: ‘ओएनजीसी’चं जहाज बुडालं; २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश
2 Covid 19: एका महिन्याने बहिणीचा मृतदेह आणण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या तरुणाला बसला धक्का
3 मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक; राहुल गांधींचे टीकासत्र सुरुच
Just Now!
X