22 September 2020

News Flash

मध्य प्रदेशात महिलांपेक्षा पुरुष रुग्ण अधिक

गेल्या सहा वर्षांत मध्य प्रदेशातील एड्स पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ३१ हजार ९६६ झाल्याची माहिती मध्य प्रदेश एड्स नियंत्रण सोसायटीने दिली आहे.

| December 1, 2014 04:56 am

गेल्या सहा वर्षांत मध्य प्रदेशातील एड्स पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ३१ हजार ९६६ झाल्याची माहिती मध्य प्रदेश एड्स नियंत्रण सोसायटीने दिली आहे. रुग्णांच्या एकूण संख्येपैकी ६० टक्के पुरुष असून तज्ज्ञांच्या मते बहुतांशी पुरुष रुग्णांना एचआयव्हीची बाधा मुख्यत्वे असुरक्षित संभोग केल्याने झाली आहे. १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाच्या पाश्र्वभूमीवर ही माहिती पुढे आली आहे.
इंदूरमध्ये एड्स आजार सर्वाधिक पसरला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. बहुतांशी पुरुष रुग्णांना एचआयव्हीची बाधा असुरक्षित लैंगिक संबंध केल्याने झाली आहे, असे इंदूरमधील शासकीय महाराजा यशवंतराव रुग्णालयाच्या अ‍ॅण्टिरीट्रोव्हियल थेरपी (एआरटी) विभागाचे प्रमुख डॉ. शिवशंकर शर्मा यांनी सांगितले.
देशभरात एड्स रुग्णांच्या संख्येत महिलांपेक्षा पुरुष अधिक असून याचे प्रमुख कारण पुरुष रुग्णांनी एकापेक्षा जास्ती जोडीदारांशी लैंगिक संबंध ठेवले हेच आहे. ट्रकचालक तसेच भरपूर काळ ठिकठिकाणी नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या व्यावसायिक लोकांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे प्रमाण खूप अधिक आहे. त्याचबरोबर समलैंगिक शरीरसंभोग हेही एड्स पुरुष रुग्ण वाढण्याचे कारण आहे, असेही डॉ. शर्मा यांनी नमूद केले.
गेल्या काही वर्षांपासून लोकांमध्ये तसेच डॉक्टरांमध्येही एड्सविषयक जनजागृतीचे प्रमाण वाढले आहे आणि म्हणून एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे एचआयव्ही बाधा झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच रुग्ण उपचारांसाठी धाव घेत आहेत असे आढळून आल्याचे डॉ. शर्मा म्हणाले.
सन २००८ ते ऑक्टोबर २०१४ या कालावधीत मध्य प्रदेश राज्यातील जवळपास ३६ लाख २२ हजार ८२९ व्यक्तींनी एड्सविषयक चाचण्या केल्या असून, त्यापैकी ३१ हजार ९६६ व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यापैकी १९ हजार ३४४ पुरुष रुग्ण असून १२ हजार ५०६ महिला रुग्ण आहेत, तर ११६  तृतीयपंथीय आहेत. मध्य प्रदेश राज्यात एचआयव्हीचा पहिला रुग्ण १९८८ साली आढळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 4:56 am

Web Title: mp hiv aids male patients
Next Stories
1 रशियाच्या ‘लेवियाथन’ चित्रपटास ‘सुवर्णमयूर’ पुरस्कार जाहीर
2 विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त, ११३ रुपयांची बचत
3 मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे सोशल मिडीयावर ‘यू-टर्न’ अभियान
Just Now!
X