मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री पारस जैन यांनी राजकारणात यशस्वी होण्याचा फॉर्म्युला सांगत विचित्र वक्तव्य केले आहे. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात जैन हे मंत्री आहेत. फक्त जे लोक अविवाहित आहेत. त्यांनीच आमदार किंवा मंत्री बनले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे मंत्री महोदय स्वत: विवाहित आहेत. त्यांनी खंडवा येथे आयोजित कार्यक्रमात हे वक्तव्य केले.

अविवाहित व्यक्तीला राजकारणात यशस्वी होण्यासाठी चांगली संधी असते, हे सांगत त्यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरणही दिले. जेव्हा एखाद्याचे लग्न होते. तेव्हा ती व्यक्ती कुटुंबाचा खूप विचार करते. जेव्हा मुलं मोठे होतात. तेव्हा त्यांच्या लग्नाच्या विचाराने तो त्रस्त असतो. पण ज्याचे लग्नच झालेले नसते त्या व्यक्तीला देशाची चिंता असते, असे म्हणत ही आपली ‘मन की बात’ असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

 

जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उदाहरण देत हे दोनच व्यक्ती फक्त आपल्या देशाची चिंता करतात, असेही ते म्हणाले.