News Flash

मध्य प्रदेश पोटनिवडणूक : मुंगवली आणि कोलारस या दोन्ही जागांवर काँग्रेसचा मोठा विजय

या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व ज्योतिरादित्य शिंदे हे करतात.

संग्रहित छायाचित्र

मध्य प्रदेशमधील कोलारस आणि मुंगावली या दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतमोजणी झाली. या दोन्ही जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून कोलारसमध्ये काँग्रेसने भाजपला ८०८३ मतांनी तर मुंगावलीमध्ये २१२४ मतांनी पराभूत केले.

२४ फेब्रुवारी रोजी दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. मुंगवालीमध्ये ७७.०५ टक्के तर कोलारसमध्ये ७०.४ टक्के मतदान झाले होते. मतदानादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मुंगवाली आणि कोलारस हे दोन्ही मतदारसंघ गुना या लोकसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे करतात.

कोलारस येथे २२ तर मुंगावली येथे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस आमदारांचे निधन झाले होते. कोलारसमध्ये काँग्रेसचे महेंद्र यादव यांची लढत भाजपाच्या देवेंद्र जैन यांच्याबरोबर आहे. तर मुंगावलीमध्ये काँग्रेसकडून बृजेंद्र यादव उभे आहेत. मुंगावली आणि कोलारस या दोन्ही ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत होत आहे.

LIVE UPDATES :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 12:40 pm

Web Title: mp odisha bye election results 2018 live updates bjp congress mungaoli and kolaras bjd bijepur
Next Stories
1 बिहारमध्ये भाजपाला धक्का, जितनराम मांझी ‘एनडीए’तून बाहेर
2 स्वत:चे घोटाळे लपवण्यासाठीच मोदी सरकारची कार्ती चिदंबरमवर कारवाई: काँग्रेस
3 सातवीतील मुलाचा चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार
Just Now!
X