आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेश काँग्रेसने शनिवारी आपला निवडणूक जाहारीनामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन काँग्रेसने जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकांवर बोनस आणि प्रत्येक ग्रामपंचायतीत गोशाळा स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने या ११२ पानी जाहीरनाम्याला वचन पत्र असे नाव दिले आहे.
शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सवलत देण्याचाही काँग्रेसने शब्द दिला आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल ५० टक्क्याने कमी करु. डिझेल, पेट्रोलचे दरही कमी करु अशी आश्वासने काँग्रेसने दिली आहेत. गायींसाठी अभयारण्ये स्थापन करण्याबरोबरच गोशाळेत गोमूत्रापासून व्यावसायिक उत्पादने सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.
Bhopal: Congress releases manifesto for Madhya Pradesh Assembly elections. pic.twitter.com/DGCqdzXQgz
— ANI (@ANI) November 10, 2018
प्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ, प्रचार समितीचे प्रमुख ज्योतिरादित्य सिंदिया आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. काँग्रेसने मध्य प्रदेश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत आणि कोऑपरेटीव्ह बँकेकडून घेतलेले २ लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
गहू, सोयाबीन, मूग, चणा, कांदा आणि ऊस या पिकांवर बोनस देण्याचाही शब्द देण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबातील एका बेरोजगार सदस्याला तीन वर्षांपासाठी १० हजार रुपये बेरोजगार भत्ता, मुलीच्या लग्नाच्यावेळी ५१ हजार रुपये तसेच भूमिहिन नागरिकांना घर बांधणीसाठी अडीज लाख रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 3:53 pm