केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले हे आपल्या खास शौलीतील भाषणासाठी ओळखले जातात. मिश्किल काव्य करणारे शीघ्रकवी म्हणूनही लोक त्यांना ओळखतात. आपल्या याच खास शैलीत त्यांनी करोना पॉझिटिव्ह आलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
अनिल देशमुखजी
आप कोरोना से मत डरोना
मैने तो बोला है गो कोरोना
कोरोना से मत हरोना।@AnilDeshmukhNCP— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 8, 2021
आठवले सोशल मीडियात कायम अॅक्टिव्ह असतात. काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन देशमुख यांना काळजीचा सल्ला दिला. ते म्हणाले, “अनिल देशमुखजी आप कोरोना से मत डरोना, मैने तो बोला है गो कोरोना, कोरोना से मत हरोना”
आठवलेंच्या या ट्विटनंतर युजर्सनी त्यांना भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मीम्सच्या सहाय्याने त्यांच्या या पोस्टला प्रतिक्रिया दिली आहे तर अनेकांनी त्यांच्या काळजीवाहू स्वभाव वैशिष्ट्याचे कौतुक केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी आपण करोना पॉझिटिव्ह असल्याचे ट्विटद्वारे जाहीर केले होते. “आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.” असं देशमुख यांनी ट्विट केलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2021 3:53 pm