News Flash

घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचं महिलेनं कापलं गुप्तांग

पोलिसांकडून दोघांवरही गुन्हा दाखल

प्रातिनिधिक

महिलेने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि पीडित दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. आरोपी घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना ४५ वर्षीय महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

महिलेने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा पती घराबाहेर होता. “आरोपी घरात घुसला तेव्हा महिला आणि तिचा १३ वर्षांचा मुलगा घऱात होते. चोर समजून मुलगा भीतीने घरातून बाहेर पळून गेला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी आरोपीने महिलेला मारहाण करत लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. जवळपास २० मिनिटं महिला विरोध करत होती असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

“आत्मसंरक्षण करताना महिलेने तिथे खाटेखाली पडलेला कोयता उचलला आणि आरोपीचं गुप्तांग कापलं. यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपीनेदेखील तक्रार केली असल्याने महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 2:46 pm

Web Title: mp woman chops off man genitals after he tries to rape her sgy 87
Next Stories
1 ठाकरे सरकारला धक्का! मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही ‘एनआयए’कडे
2 संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे; बंगळुरूतील सभेत शिक्कामोर्तब
3 व्हॉट्सअप ४० मिनिटांसाठी डाऊन होतं सांगत मोदींनी साधला ममता बॅनर्जींवर निशाणा; म्हणाले…
Just Now!
X