News Flash

पाकिस्तानात ‘एमक्यूएम’ पक्षाच्या लोकप्रतिनिधीची हत्या

मुत्ताहिता क्वामी मूव्हमेण्ट (एमक्यूएम) पक्षाचे आमदार आणि त्यांच्या पुत्राची शुक्रवारी येथील एका मशिदीबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.शुक्रवारचे नमाजपठण करून साजिद कुरेशी

| June 22, 2013 02:13 am

मुत्ताहिता क्वामी मूव्हमेण्ट (एमक्यूएम) पक्षाचे आमदार आणि त्यांच्या पुत्राची शुक्रवारी येथील एका मशिदीबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.शुक्रवारचे नमाजपठण करून साजिद कुरेशी आणि त्यांचा पुत्र निझामाबाद परिसरातील एका मशिदीतून बाहेर पडताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात साजिद जागीच ठार झाले, तर त्यांचा पुत्र हॉस्पिटलमध्ये मरण पावला. ही घटना घडताच परिसरातील जनजीवन ठप्प झाले. सिंध असेंब्लीचे सदस्य म्हणून साजिद कुरेशी हे अलीकडेच निवडून आले होते. या हत्येची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 2:13 am

Web Title: mqms mla killed in pakistan
टॅग : Pakistan
Next Stories
1 काँग्रेसच्या खासदार, आमदारांना एक महिन्याचे वेतन देण्याचे आदेश
2 उत्तराखंड: मदतकार्याला वेग; गौरीकुंड परिसरात एक हजार पर्यटकांपर्यंत पोहोचण्यात लष्कराला यश
3 दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपीला कारागृहातून परीक्षा देण्याची मुभा
Just Now!
X