04 December 2020

News Flash

महेंद्र सिंग धोनीच्या बर्थ डेचा कूल अंदाज, व्हिडिओ व्हायरल!

साक्षी धोनीला धोनीच्या टीममेट्सनी दिलेल्या सरप्राईज केक पार्टीमुळे आनंद

महेंद्रसिंह धोनी ( संग्रहीत छायाचित्र )

महेंद्रसिंग धोनी अर्थात माहीचा आज वाढदिवस आहे, त्याच्या या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आले आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे, धोनीसोबत सेलिब्रेशनसाठी त्याची पत्नी साक्षी, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या दिसत आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या धोनीने खास त्याच्या शैलीत वाढदिवस साजरा केला आहे. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि त्याच्या इतर मित्रांनी त्याला आधीच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपला ३६ वा वाढदिवस साजरा करणारा एम एस धोनी हा आजवरचा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे यात काहीही शंका नाहीये. तो कप्तान असताना भारताने T20 विश्वचषक, २०११ मध्ये क्रिकेटमधला विश्वचषक, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हे सगळे बहुमान आणि पुरस्कार भारताकडे खेचून आणले आहे. तसेच कसोटी स्पर्धेतही धोनीसोबत टीम इंडियाने चांगले यश मिळवले. धोनी हा मूळचा रांचीचा असून त्याला क्रिकेटमध्ये येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र जेव्हा तो आला तेव्हा त्याने जगभरातल्या क्रिकेट रसिकांची मनं जिंकून मागे वळून कधीही पाहिलेलं नाही.

महेंद्रसिंग धोनी अनेक अडचणींचा सामना करून आलेला असल्यामुळेच त्याचा खेळतानाचा अॅटीट्युड हा कायम कूल असतो. त्याचमुळे कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनी हे बिरूद त्याला जगाने बहाल केलं आहे. त्याची निर्णयक्षमता आणि खेळ जिंकण्याची रणनीती जबरदस्त आहे हे आजवर भारताने आणि क्रिकेट रसिकांनी अनुभवले आहे. हातातून सामना गेला असे वाटत असताना जर धोनी मैदानावर उतरला तर त्याने अनेकदा विजय खेचून आणला आहे.

असा आगळावेगळा कॅप्टन असलेला महेंद्रसिंग धोनी याचा वाढदिवस असताना त्याच्या टीममेंबर्सनी सेलिब्रेशनचा काही प्लान आखला नसता तरच नवल वाटलं असतं. या सगळ्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या धोनीला सरप्राईज देत एक छोटासा केक कापण्याचा कार्यक्रम आखला. धोनी आराम करत असतानाच त्याला हे छान सरप्राईज देऊन त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. १० सेकंदाच्या व्हिडिओत आपल्याला हॅपी बर्थ डे धोनी हे गाणेही ऐकता येते आहे. साक्षीलाही धोनीसाठी असलेले हे सरप्राईज खूपच आवडले आहे कारण या व्हिडिओत ती टाळ्या वाजवताना आणि आनंद साजरा करताना दिसते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2017 4:13 pm

Web Title: ms dhoni cuts his birthday cake
Next Stories
1 धोनीसाठी सेहवागने दिलेला शुभेच्छा संदेश २ तासांत २८०० वेळ रिटि्वट
2 …तर बुरहान वानीला जिवंत ठेवलं असतं: काँग्रेस नेता
3 नरेंद्र मोदींना हटवल्यानंतरच स्वस्थ बसेन!:लालूप्रसाद यादव
Just Now!
X