गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप नसलेल्या राजकीय कैद्यांना सोडून देण्याचा आदेश मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी दिला असून त्याचे पालन केले जाईल, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. जम्मू-काश्मीर मुस्लीम लीगचा फुटीरतावादी नेता मसरत आलम याच्यावर गुन्हेगारीचा आरोप नसल्याने त्याची सुटका आली.२००८ व २०१० मधील दंगलीत दगडफेक करण्यात तो आघाडीवर होता.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक के. राजेंद्र कुमार यांनी सांगितले की, राजकीय कैद्यांना सोडून देण्याच्या सरकारच्या आदेशांचे पालन केले जाईल असे स्पष्ट केले.
राजकीय कैद्यांना सोडून देण्याची प्रक्रिया पोलिसांच्या पातळीवर सोडली जाईल काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की, सरकारच्या आदेशांचे पोलीस खाते पालन करील.  सईद यांनी गुन्हेगारी आरोप नसलेल्या राजकीय कैद्यांची सुटका करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू करावी, असे स्पष्ट केले होते.
आलम याची मुस्लीम लीग ही संघटना सैयद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वातील हुर्रियत कॉन्फरन्स या जहाल संघटनेची घटक आहे. २०१० सालच्या उन्हाळ्यात काश्मीरमधील राष्ट्रविरोधी निदर्शकांना भडकवण्यात त्याच्या  सहभागाबद्दल ऑक्टोबर २०१० मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. या आंदोलनात १२० जण ठार, तर हजारो जखमी झाले होते.