News Flash

ब्लेअर कन्येला बंदुकीचा धाक दाखवून रोखले

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची कन्या कॅथरिन हिला अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लंडन शहरातील मध्यवर्ती भागात बंदुकीचा धाक दाखवून रोखून ठेवले होते.

| September 20, 2013 12:01 pm

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची कन्या कॅथरिन हिला अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लंडन शहरातील मध्यवर्ती भागात बंदुकीचा धाक दाखवून रोखून ठेवले होते. मात्र सुदैवाने कॅथरिन बंदूकधाऱ्यांच्या ताडीतून सहीसलामत बचावल्या.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला कॅथरिन आपल्या मित्रासमवेत फिरावयास गेली असताना दोघा बंदूकधाऱ्यांनी तिला अडविले आणि रोख रक्कम आणि दागिन्यांची मागणी केली. मात्र काही कळण्याच्या आतच ते दोन बंदूकधारी रिकाम्या हातानेच पसार झाले. स्कॉटलंड यार्डकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 12:01 pm

Web Title: muggers pull gun on tony blairs daughter
Next Stories
1 बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन
2 मुझफ्फरनगर दंगल: प्रक्षोभक भाषणाबद्दल भाजपच्या आमदाराला अटक
3 ‘आयटीआयआर’ मंजूर; १५ लाख रोजगार निर्मितीची शक्यता
Just Now!
X