शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांचे वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे अशी इच्छा जाहीर केली आहे. जर राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट आमच्या परिवाराकडून ठेवली जाईल. शिवाय राम मंदिर बांधायला सोन्याची वीट दान देऊ, असे तुसी म्हणाले आहेत. अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद वादावर आपले मांडण्याची याचिका नुकतीच तुसी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पण कोर्टाने ही याचिका स्विकारली नव्हती.

हैदराबादमध्ये राहणारे मुघल राजघराण्याचे वंशज तुसी यांनी अयोध्येत राम मंदिरासाठी जागा द्यावी अशी विनंती केली आहे. कोणाकडेही अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेच्या मालकीची कागदपत्रे नाहीत. पण मुघल शासकांचा वंशज या नात्याने ती जमीन कोणाला दिली जावी याविषयी मत व्यक्त करण्याचा हक्क तरी मला नक्कीच आहे. कोर्टाने जर मला तसी परवाणगी दिली तर अयोध्येतील सर्व वादग्रस्त जमीन मी राम मंदिर बांधण्यासाठी परत देईन असेही तुसी म्हणाले आहेत. यापूर्वीही असा प्रस्ताव तुसी यांनी ठेवला होता.

तुसी यांच्या म्हणण्यानुसार, बादशहा बाबरने सैनिकांना नमाज पढण्याची सोय व्हावी यासाठी अयोध्येत मशीद बांधली होती. सैनिकांशिवाय तेथे कोणीही नमाज पठण करण्याची परवाणगी नव्हती. ही जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे त्यावर मला बोलायचे नाही. मात्र, रामाचे जन्मस्थान असल्याचा दावा करणाऱ्यांच्या भावनांचा आदर करायला हवा.