15 December 2019

News Flash

मुघलांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचे काम केलं : संगीत सोम

भाजपा आमदार संगीत सोम म्हणाले, आम्ही हिंदू संस्कृतीला वाचवण्याचे काम करीत आहोत.

संगीत सोम, भाजपा आमदार

मुस्लिम संस्कृतीशी संबंधीत असलेल्या शहरांची नावे बदलण्याचा उद्योग सध्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सुरु केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना येथील भाजपा आमदार संगीत सोम यांनी एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांवर तोफ डागली आहे. मुघलांनी भारतातली हिंदू संस्कृती नष्ट करण्याचे काम केले होते, असे विधान त्यांनी केले आहे. सोम हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात.


सोम म्हणाले, मुघलांनी इथली संस्कृती नष्ट करण्याचे काम केले आहे. विशेषतः त्यांनी हिंदुत्वाला संपवण्याचे काम केले. आम्ही या हिंदू संस्कृतीला वाचवण्याचे काम करीत आहोत. यासाठी भाजपा प्रयत्न करीत असून यासाठी आम्ही कायमच पुढाकार घेत राहणार आहोत.

उत्तर प्रदेशात नुकतेच अलाहाबाद शहराचे नामांतर प्रयागराज करण्यात आले. त्यानंतर दीवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण अयोध्या करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

यावर बोलताना सोम म्हणाले, अद्याप अनेक शहरांची नावे बदलणे बाकी आहे. मुझ्झफरनगरचे नाव बदलले जाणार आहे. मुझ्झफरनगरचे नाव बदलून लक्ष्मीनगर ठेवण्याची लोकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. एक नवाब मुझ्झफर अली याने आपल्या शहराचे नाव मुझ्झफरनगर असे ठेवले होते.

First Published on November 9, 2018 3:02 pm

Web Title: mughals did the work of destroying indian culture says sangit som bjp mla
Just Now!
X