News Flash

मलेशियाच्या पंतप्रधानपदी मुहियिद्दीन यासीन

मुहियिद्दीन यासीन यांच्या रूपाने घोटाळयात अडकलेला एक पक्ष सत्तेवर आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

मलेशियात महाथीर मोहम्मद यांचा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पराभव झाला असून, फारसे परिचित नसलेले अंतर्गत मंत्री मुहियिद्दीन यासीन हे नवे पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या रूपाने घोटाळयात अडकलेला एक पक्ष सत्तेवर आला आहे.

यासीन यांच्या आश्चर्यकारक विजयामुळे केवळ जगातील सर्वात वृद्ध पंतप्रधान असलेले ९४ वर्षांचे महाथीर हेच बाजूला झाले आहेत असे नसून, अन्वर इब्राहिम यांचीही अलीकडच्या काळात देशाचे नेते होण्याचे स्वप्न भंगले आहे.

मलेशियातील सुधारणावादी सत्ताधारी आघाडी सरकार गेल्या आठवडय़ात कोसळल्यानंतर, खासदारांचा सर्वाधिक पाठिंबा कुणाला आहे याचा निर्णय घेऊन राजांनी मुहियिद्दीन यांची निवड केल्याचे राजघराण्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 12:29 am

Web Title: muhyiddin yasin prime minister of malaysia abn 97
Next Stories
1 US-तालिबान मध्ये शांती करार, १४ महिन्यात अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तान सोडणार
2 निर्भया प्रकरण : फाशी टाळण्यासाठी आता आरोपी अक्षयची कोर्टात पुन्हा धाव
3 अखेर बँकांचा तीन दिवसांचा संप स्थगित
Just Now!
X