07 July 2020

News Flash

‘टाइम्स’च्या यादीत मुकेश अंबानी, अरुंधती काटजू, मेनका गुरुस्वामी

‘टाइम’ या नियतकालिकाने जगभरातील प्रभावी व्यक्तींची २०१९ मधील यादी नुकतीच जाहीर केली आहे

 न्यू यॉर्क : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि लोकचळवळींसाठी कायदेशीर लढा देणाऱ्या अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांचा सहभाग जगभरातील प्रभावी व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे. ‘टाइम’ या नियतकालिकाने जगभरातील प्रभावी व्यक्तींची २०१९ मधील यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात या तिघांचा समावेश आहे. या यादीत भारतीय-अमेरिकन कॉमेडियन हरन मिनाज, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समावेश आहे.

मुकेश अंबानी यांची व्यावसायिक धोरणे ही अधिक व्यापक असून त्यामुळेच जवळपास २८० दशलक्ष लोकांना कमी किमतीत ४जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे जगभरात व्यापाराचा विस्तार करून त्यांची ‘कर लो दुनिया मुठ्ठीमे’ हे घोषवाक्य खरे केले आहे. तर अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांनी एलजीबीटीक्यू यांच्यासाठी लढा देऊन कायदेशीर मार्गाने त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2019 2:42 am

Web Title: mukesh ambani arundhati katju menaka guruswamy time list of 100 most influential people
Next Stories
1 काही दशके नाही, पाच वर्षांत नॉत्रेदामची पुनर्बाधणी करू!
2 आठ वर्षांत बेरोजगारी दुप्पट, नोटाबंदीचाही फटका
3 मसूद अझरचा मुद्दा सुटण्याच्या मार्गावर,चीनचा दावा
Just Now!
X