News Flash

फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल

टेलिकॉम क्षेत्रातील कामगिरीबद्दल सन्मान

मुकेश अंबानी (संग्रहित छायाचित्र)

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीत अव्वल असल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. जगातील २५ उद्योजकांमध्ये अंबानी यांना पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले असल्याने ही भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाची बाब आहे. भारतीय जनतेला जिओच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सुविधा पुरविण्याच्या सुविधेमुळे अंबानी यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

तेल आणि गॅसबरोबरच अंबानी यांनी टेलिकॉम क्षेत्रातही दमदार प्रवेश केला आहे, रिलायन्सच्या जिओने भारतातील जवळपास १० कोटी नागरिकांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, असे सांगत फोर्ब्सकडून अंबांनींचे कौतुक करण्यात आले आहे.

अंबानी यांच्याशिवाय या यादीमध्ये डायसन कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, सौदी येथील प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, टायकून क्रिस्टो आणि ब्लॅक रॉकचे लैरी फिंक यांनाही स्थान मिळाले आहे.  यावेळी मुकेश अंबानी म्हणाले, जिओचं कार्ड आता घरपोच मिळणार आहे. हे सिमकार्ड पाच मिनिटांत अॅक्टिव्हेट होईल. शिवाय इतर मोबाईल नंबरही जिओ 4Gमध्ये पोर्ट करण्याची सोय असल्याचंही अंबानी यांनी सांगितलं. या यशासाठी अंबानी यांनी ग्राहक, सरकार आणि ट्रायचे आभार मानले. अवघ्या 3 महिन्यांतच जिओचे 5 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झाले आहेत. तसंच दिवसाला 6 लाख ग्राहक जिओ 4Gची सेवा घेत असल्याचं मुकेश अंबानी यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 7:51 pm

Web Title: mukesh ambani tops in forbs list
Next Stories
1 स्वच्छतेत पुणे स्टेशन ‘ए वन’; ‘टॉप टेन’मध्ये एन्ट्री!
2 नरेंद्र मोदींविरोधात फतवा काढणाऱ्या शाही इमामांना पदावरुन हटवले
3 तिरूपती देवस्थानाच्या काॅम्प्युटर्सना ‘रॅन्समवेअर’चा तडाखा
Just Now!
X