ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रात सत्ताबदल झाल्यामुळे जी. व्ही. वहानवटी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपप्रणीत सरकारने रोहतगी यांची देशाचे १४ वे अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली आहे.
सरकारचा वरिष्ठ कायदा अधिकारीपदासाठी माझी निवड करण्यात आली असून आपणही त्याचा स्वीकार केला आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा करायची असल्याचे रोहतगी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रोहतगी यांनी यापूर्वी एनडीए सरकारच्या काळात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले होते. सरकारने आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे सरकार कोणत्याही किरकोळ तसेच चुकीच्या कायदेशीर कचाटय़ांत सापडू नये, या दृष्टीने प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे रोहतगी यांनी सांगितले.

Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
pm Narendra Modi in Yavatmal
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमार्गे यवतमाळात
yana Mir Malala Yusufzai
“मी मलाला नाही, मी माझ्या जन्मभूमीपासून…”, जम्मूच्या सामाजिक कार्यकर्तीचं युकेच्या संसदेतील भाषण व्हायरल
Due to lack of financial authority additional commissioner is facing problems
वित्तिय अधिकार नसल्याने अतिरिक्त आयुक्तांपुढे पेच, आयुक्त प्रशिक्षणासाठी रवाना