गृहमंत्रालयाकडून मान्यता

भाजपमधून अलीकडेच पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात परतलेले पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांना पुरविण्यात आलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांच्याच विनंतीवरून काढून टाकण्यात आली आहे, असे गुरुवारी अधिकृत सूत्रांनी सांगितले.

रॉय यांना पुरविण्यात आलेली झेड दर्जाची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलास (सीआरपीएफ) दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसमध्ये परतलेले रॉय आणि त्यांचा पुत्र शुभ्रांशू यांना आता राज्य पोलिसांकडून सुरक्षा देण्यात येणार आहे. आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा काढून घेण्यात यावी, असे पत्र रॉय यांनी केंद्र सरकारला लिहिले होते.

रॉय भाजपमध्ये आल्यावर त्यांना सीआरपीएफची वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती, त्यांनतर राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.