लोकसभेच्या पुढील निवडणुकीत जर मुलामयसिंह यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास काँग्रेस तयार असेल, तर आम्हाला त्यांच्याशी आघाडी करण्यात काहीच हरकत नाही, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान समाजवादी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अखिलेख यांनी हे जाहीर विधान केले.

मुलायमसिंहजी पंतप्रधान आणि राहुल गांधी यांना उप-पंतप्रधान केले जाणार असेल तर मी अगदी आत्ता, या क्षणीही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार आहे, अशा स्पष्ट शब्दांत अखिलेश यांनी काँग्रेसला पुढील लोकसभा निवडणुकीसाठी ‘ऑफर’च देऊ केली. मात्र त्याचवेळी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत बिहारप्रमाणे महाआघाडीसारखी मोट बांधण्याची समाजवादी पक्षाला गरज भासणार नाही, असा दावा त्यांनी केला. भविष्यात कधीही भाजपशी युतीची कोणतीही शक्यता नसल्याचेही ते म्हणाले.