समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची रविवारी तब्येत खालवल्याने त्यांना तातडीने सायंकाळी राममनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्था येथे दाखल करण्यात आले होते. रक्तातील साखर अचानक कमी झाल्याने त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांना त्यांची तपासणी केली. थोड्यावेळाने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत संस्थेचे ए के त्रिपाठी यांनी माहिती दिली की, मुलायम सिंह यादव यांना सकाळी अशक्तपणा वाटू लागल्याने, त्यांना हृदय रोग विशेषज्ञ डॅा. भुवनचंद तिवारी यांना दाखवण्यात आले होते. या दरम्यान त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले, त्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांना उच्च मधुमेह व हाइपर टेंशनचा त्रास आहे. डॅाक्टरांचे पथक त्यांच्या उपचारात लागले होते, रात्र उशीरापर्यंत त्यांच्या तब्येतीत सुधारणा आढळून आली.