News Flash

समाजवादी नेते मुलायम सिंह यांना स्वाइन फ्लूची शक्यता

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांना गुरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचा संशय आहे.

| March 8, 2015 01:01 am

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांना गुरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचा संशय आहे.
मुलायम सिंह यांना  श्वासोच्छवासास त्रास होत होता व अस्वस्थता जाणवत होती.  डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्यात स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत आहेत, पण त्याची खातरजमा केल्यानंतरच काही निश्चित निदान सांगता येईल.
लखनौ येथे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, मुलायम सिंह यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 1:01 am

Web Title: mulayam singh yadav suspected to have swine flu hospitalised
Next Stories
1 दिमापूरमधील जनजीवन पूर्वपदाकडे
2 ‘भारतीय मच्छिमारांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्यास गोळया घालू’
3 केजरीवाल कधीतरी चुकतात!
Just Now!
X