News Flash

सपाची १६ फेब्रुवारीला मुंबईत जाहीर सभा

हिंदू-मुस्लीम ऐक्याला चालना देण्यासाठी इस्लामी यादव सरकारने गुलाम अली यांना निमंत्रण दिले आहे, ऐ

शिवसेनेने उत्तर प्रदेशला ‘इस्लाम राज्य’ म्हटल्याने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी मुंबईत येत्या १६ फेब्रुवारी रोजी एका जाहीर सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात देशाच्या आर्थिक राजधानीत मोठा संघर्ष पेटण्याची लक्षणे दिसत आहेत.
मुंबईत १६ फेब्रुवारी रोजी मुलायमसिंह यादव ‘देश बनाओ, देश बचाओ’ मेळाव्याला संबोधित करणार असल्याचे महाराष्ट्रातील सपाचे नेते अबू आझमी यांनी सांगितले.
तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी उत्तर प्रदेश सरकार देशविरोधी कृती करीत असल्याची टीका शिवसेनेने केली होती त्या पाश्र्वभूमीवर मुलायमसिंह यांच्या जाहीर सभेला महत्त्व दिले जात आहे. रविवारी गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शिवसेनेने अखिलेश यादव सरकारवर टीकेची झोड उठविली होती.
हिंदू-मुस्लीम ऐक्याला चालना देण्यासाठी इस्लामी यादव सरकारने गुलाम अली यांना निमंत्रण दिले आहे, ऐक्याला चालना देण्यासाठी पाकिस्तानच्याच कलाकारांना निमंत्रण देण्याची गरज काय, देशातही अनेक उत्तम मुस्लीम कलावंत आहेत, अशी टीका शिवसेनेने मुखपत्रातून केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2016 3:11 am

Web Title: mulayam singh yadav to hold rally in mumbai on february 16
टॅग : Mulayam Singh Yadav
Next Stories
1 तेलंगणामध्ये टीडीपी आमदाराचा टीआरएसमध्ये प्रवेश
2 एनडीएचे तेलंगणाला सहकार्य नाही – कविता
3 कारवाया रोखण्यासाठी ‘एनआयए’ची सोशल नेटवर्किंगकडे सहकार्याची मागणी
Just Now!
X