उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची भाची संध्या यादव समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मैनपुरी येथून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
संध्या यादव या बदायूंचे माजी खासदार धर्मेंद्र यादव यांची बहीण आहे आणि आता मैनपुरीच्या जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष देखील आहेत. मागील निवडणूक त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकीटावर जिंकली होती. मात्र यंदा त्यांनी भाजपाच्या उमेदवार म्हणून बुधवारी आपली उमेदवारी दाखल केली.
१९ एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे.२०१७ मध्ये संध्या याचे पती अनुजेश यादव (शिवपाल यादव याचं निकटवर्तीय आणि फिरोजाबाद जिल्हा पंचायतीचे सदस्य) यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याच्या आठवडाभरानंतरच संध्या यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2021 4:34 pm