News Flash

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला मिळालं २,५०० कोटीचं कंत्राट

हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्प जपानी इ ५ शिंकानसेन टेक्नोलॉजीवर आधारीत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या देशातील पहिल्या हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पातंर्गत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला २५०० कोटी रुपयाचे मोठे कंत्राट मिळाले आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. त्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान होणार आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पाची अमलबजावणी करणार आहे. हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्प जपानी इ ५ शिंकानसेन टेक्नोलॉजीवर आधारीत आहे. बुलेट ट्रेन हा मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. ते जपानच्या सहकाऱ्याने हा प्रकल्प तडीस नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालिन पंतप्रधान शिंझो अबे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०१७ मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. हा ५०८ किलोमीटरचा मार्ग आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सुरु झाल्यानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून ९० हजार पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होऊ शकतात. प्रतितास ३०० किमी पेक्षा जास्त वेग गाठवण्याचा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उद्देश आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रन व्यतिरिक्त दिल्ली-अहमदाबाद, दिल्ली-अमृतसर, वाराणसी-हावडा, दिल्ली-वाराणासी, मुंबई-हैदराबाद, मुंबई-नागपूर, चेन्नई-मैसोर दरम्यान हायस्पीड रेल कॉरिडोरची व्यवहार्यता तपासण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 5:05 pm

Web Title: mumbai ahmedabad bullet train larsen toubro bags up to rs 2500 crore contract dmp 82
Next Stories
1 ठरलं… मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार
2 ‘तुम्हाला लाज वाटत नाही?’ दीप सिद्धूची शेतकरी नेत्यांना ‘सिक्रेट’ उघड करण्याची धमकी
3 सासऱ्यांच्या सांगण्यावरुन तिकीट विकत घेणाऱ्या गृहिणीने जिंकली अडीच कोटींची लॉट्ररी
Just Now!
X