मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची गुरुवारी रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्य़ातील हरिनगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खुर्शीद आलम याच्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी बेछूट गोळीबार केला. या दुचाकीची नंबरप्लेट भारतीय असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीची हत्या करण्यात आल्यानंतर हल्लेखोर भारतात पसार झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात नेपाळचा एक पोलीस हवालदारही जखमी झाला आहे. सदर हवालदाराने भारत-नेपाळ सीमेवर दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोरांनी हवालदारावरही गोळ्या घातल्या.

बाटला चकमकीतील फरार दहशतवादी शहजाद पप्पू याच्या अटकेनंतर आलमचे नाव समोर आले होते. खुर्शीद आलम हा आयएसआयसाठी काम करीत होता. इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी बाटला चकमकीनंतर फरार झाल्यानंतर खुर्शीदने पासपोर्ट तयार केला  होता. तो आयएसआयचा हस्तकही होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai blast accused khurshid alam killed in nepal
First published on: 22-09-2018 at 01:00 IST