29 May 2020

News Flash

विमानात महिलेच्या शेजारी पाहत होता पॉर्न क्लिप, तंबी देऊन सोडलं

मुंबईतील एक व्यावसायिक विमानात महिलेच्या शेजारी बसून पॉर्न क्लिप पाहता होता. मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली.

संग्रहित छायाचित्र

विमानात महिलेच्या शेजारी बसून पॉर्न क्लिप पाहणाऱ्या मुंबईतील एका व्यावसायिकाला फक्त इशारा देऊन सोडण्यात आले. सीआयएसएफने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. शनिवारी रात्री मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली. रात्री अकराच्या सुमारास या विमानाने मुंबई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर रात्री १२.५० च्या सुमारास हे विमान चेन्नईत पोहोचले.

मादीपाक्कम येथे राहणारी महिला तिच्या मुलासोबत विमानाने प्रवास करत होती. नवऱ्याला भेटून ती चेन्नईला परतत असताना ही घटना घडली. शेजारच्या सीटवर बसलेला हा माणूस तिला दिसेल अशा पद्धतीने पॉर्न क्लिप पाहत होता असे या महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेने विमानाच्या केबिन क्रू कडे याची तक्रार केली.

क्रू मेंबर्सनी त्या माणसाला दुसऱ्या आसनावर बसायला सांगितले. पण त्याने नकार दिला. त्यानंतर फ्लाईट कॅप्टन तिथे आला. त्याने महिलेला दुसरी जागा करुन दिली. विमानाच्या कॅप्टनने चेन्नईच्या एटीसीला आणि सीआयएसएफला या घटनेची माहिती दिली. सीआयएसएफने पॉर्न पाहणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेऊन एअरपोर्ट पोलिसांकडे दिले. महिलेने आरोपीविरोधात लिखित तक्रार दाखल करायला नकार दिला व पोलिसांना त्याला इशारा देऊन सोडण्यास सांगितले. त्यामुळे त्याची सुटका करावी लागली. त्या व्यावसायिकाने सुद्धा आपल्या वागण्याबद्दल माफी मागितली असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2019 6:29 pm

Web Title: mumbai businessman watched porn on his mobile visible to women
Next Stories
1 खासदार हेमा मालिनी मथुरेसाठी काय केलं तेच विसरल्या
2 डीआरडीओची कमाल! पाकिस्तानी रडारच्या हालचालींची मिळणार अचूक माहिती
3 मुकेश अंबानींच्या कंपनीने तिरुमला देवस्थानला दिले १.११ कोटी
Just Now!
X