News Flash

तुरूंगातच बाळाला जन्म, कतारमध्ये ‘बळीचा बकरा’ बनलेलं ‘ते’ दाम्पत्य अखेर मुंबईत परतलं

तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या चिमुकलीसह हे दाम्पत्य मध्यरात्री मुंबईत परतलं...

(फोटो सौजन्य : ट्विटर )

कतारमध्ये ट्रिपसाठी गेलेलं मुंबईतील ओनिबा कुरेशी आणि शरीक कुरेशी हे दाम्पत्य दोन वर्षानंतर अखेर मुंबईत परतलं आहे. त्यांना २०१९ मध्ये एका ड्रग प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या चिमुकलीसह हे दाम्पत्य मध्यरात्री मुंबईत परतलं. नार्कोटिस्क कन्ट्रोल ब्युरोने केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची सुटका झाली आहे.

जुलै २०१९ मध्ये कतारमधील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या बॅगमध्ये 4.1 किलो चरस सापडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे नंतर शरीक यांच्या काकू तबस्सुम रियाज कुरेशी यांनीच ड्रग्स तस्करीसाठी दाम्पत्याची फसवणूक केल्याचं समोर आलं. शिवाय ओनिबा आणि शरीक यांच्या ट्रिपचं आयोजनही तबस्सुम यांनीच केल्याचा खुलासा नंतर झाला.

अखेर त्यांच्या कुटुंबियांनी भारत सरकारकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मदत मागितली. नंतर नार्कोटिस्क कन्ट्रोल ब्युरोने कतारमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, व दाम्पत्याच्या नातलगांनी कोर्टात शिक्षेविरोधात अपील केलं. दरम्यानच्या काळात गेल्या फेब्रुवारीमध्ये गर्भवती असलेल्या ओनिबाने कारागृहातच बाळाला जन्म दिला. अखेर 3 फेब्रुवारीला कोर्टाने या दाम्पत्याची निर्दोष सुटका केली. ड्रग्स प्रकरणात ‘बळीचा बकरा’ ठरलेलं हे दांम्पत्य आता तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या मुलीसह भारतात परतलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 8:43 am

Web Title: mumbai couple convicted in drug case in qatar returns home sas 89
Next Stories
1 चालू तिमाहीत ‘स्पुटनिक व्ही’ची आयात
2 ‘मोदी यांच्याकडून पाकिस्तानला लष्करी प्रत्युत्तराची शक्यता जास्त’
3 ‘मरकझ’ला परवानगी नाही!
Just Now!
X